संत गाडगे महाराज माहिती | Sant Gadge Maharaj Information in Marathi

मित्रांनो आज आपण एक थोर समाजसेवक संत गाडगे बाबा यांच्याविषयी माहिती ( Gadge maharaj information in Marathi ) पाहणार आहोत.

 

संत गाडगे महाराज हे मराठी कीर्तनकार, भारतीय संत व एक थोर समाजसुधारक होते. समाजात स्वच्छतेचे महत्व समजावून देण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले.

संत गाडगे महाराज यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. गाडगे बाबा यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणाजी जानोरकार व आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते.

बाबांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामधील शेंडगाव या गावात झाला. आईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले. लहानपणीच दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे बालपण हे आईच्या माहेरी मूर्तिजापूर मधील दापुरे या गावात गेले.

घरची परिस्थिती बिकट असल्याने लहानपणी त्यांना गुरे राखणे, नांगर चालविणे शेतीची कामे करणे अशी कामे करावी लागायची. मामाकडे बरीच शेतजमीन होती. शेती मध्ये त्यांची लहानपणापासूनच रुची होती. स्वच्छता हा त्यांचा अंगी असलेला विशेष गुण होता. त्यांना कामाची लहानपणापासून आवड होती.

गाडगे महाराज यांचे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच 1892 साली झाले. त्यांना 4 मुली होत्या. मुलीच्या बारश्याला रुढी प्रमाणे दारू व मटणाचे जेवण न देता त्यांनी गोडधोड जेवण दिले. गावातील कोणत्याही कामासाठी ते स्वईच्छेन नेहमी पुढे येत असत. काही न बोलता त्यांनी गावातील कामे सर्व जणांनी एकत्र येऊन केली पाहिजेत असा धढा गावकऱ्यांना दिला. परंतु जास्त काळ त्यांचे मन संसारात रमले नाही व 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी संसाराचा त्याग केला. त्यांनी अनेक तिर्थांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यांनी काही काळ वनवास देखील केला परंतु वनवासात देखील त्यांनी लोकसेवा सोडली नाही. प्रत्येक गरजुला मदत करण्यासाठी ते पुढे येत असे व कोणत्याही फळाची अपेक्षा ते करत नसत.

भ्रमण करताना अंगावर फाटके तुटके कपडे, एक खराटा व एक फुटके गाडगे स्वतःजवळ ठेवत असत. यामुळे लोक त्यांना “गाडगेबाबा” असे म्हणू लागले. ते ज्या गावात प्रवेश करायचे तिथे स्वच्छतेची कामे करायचे. सामाजिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन अशी तत्वे लोकांना समजावण्यासाठी त्यांनी सातत्याने स्वतः सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या कीर्तनातून ते श्रोत्यांना प्रश्न विचारून अज्ञानाची व दुर्गुणांची जाणीव करवून द्यायचे.


त्यांचे उपदेशही अत्यंत साधे, सोपे लोकांना समजतील असे असत. तुम्ही चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून नेहमी सांगत असत. देव दगडात नसून माणसात आहे हे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजविण्याचे काम केले.

गाडगे महाराज हे संत तुकाराम यांना आपले गुरू मानायचे. लोकांना आपले कीर्तन समजावे यासाठी ते सामान्य गावठी भाषेचा प्रामुख्याने वर्हाडी भाषेचा उपयोग कीर्तनात करत असे. गाडगे महाराज त्यांच्या कीर्तनात अभंगाचा देखील मुबलक प्रमाणात वापर करायचे.

त्यांनी लोकांना खालील प्रमाणे दशसुत्री संदेश दिला
“गाडगेबाबा प्रबोधन काव्य”
भुकेलेल्यांना – अन्न
तहानलेल्यांना – पाणी
उघड्यानागड्यांना – वस्त्र
गरीब मुलामुलींना – शिक्षणासाठी मदत
बेघरांना – आसरा
अंध, पंगू रोगी यांना – औषधोपचार
बेकारांना – रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना – अभय
गरीब तरुण-तरुणींचे – लग्न
दुःखी व निराशांना – हिंमत
गोरगरिबांना – शिक्षण
हाच आजचा खरा धर्म व देवपूजा आहे असे त्यांचे मत होते.

ते ज्या गावी जात असे तेथील लोक त्यांना धन देत असत परंतु हे धन कधी गाडगे महाराजांनी स्वतःसाठी वापरले नाही. या धनाचा वापर करून त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. स्वतःसाठी मात्र त्यांनी साधी झोपडी देखील या पैशातून बांधली नाही ते नेहमी झाडाखाली आश्रय घेत असे.

‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.

संत गाडगे महाराज यांची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

1. नांदेड शहराबद्दल माहिती

संत गाडगे महाराज यांचे कार्य ( Gadge Baba Work )

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचे’ मंदिर बांधले.

१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.

१९२५ – मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले.

१९१७ – पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.

“मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.

गाडगे महाराज “गोधडे महाराज” म्हणूनही ओळखले जात होते.

१९३२ – ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.. . गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.

“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गीत मन्ना डे यांनी गायले.

आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’

१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.

गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.

२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव – अमरावती. येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

संत गाडगे महाराज यांची चरित्रे ( Shri Gadge Maharaj Book )


असे होते गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत.

ओळख गाडगेबाबांची – प्राचार्य रा.तु. भगत.

कर्मयोगी गाडगेबाबा – मनोज तायडे.

गाडगेबाबा – चरित्र, प्रबोधनकार ठाकरे.

गाडगे बाबांचा पदस्पर्श – केशव बा. वसेकर.

श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन – गो.नी. दांडेकर.

Shri Gadge Maharaj – इंग्रजी, गो.नी. दांडेकर.

गाडगेबाबांच्या सहवासात – जुगलकिशोर राठी.

गाडगे माहात्म्य – काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले.

गोष्टीरूप गाडगेबाबा – विजया ब्राम्हणकर.

निवडक गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत.

मुलांचे गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत.

लोकशिक्षक गाडगेबाबा – रामचंद्र देखणे.

लोकशिक्षणाचे शिल्पकार – रा.तु. भगत.

लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य – डॉ. द.ता. भोसले.

The Wandering Saint – इंग्रजी, वसंत शिरवाडकर.

संत गाडगेबाबा – गिरिजा कीर.

संत गाडगेबाबा – दिलीप सुरवाडे.

संत गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत.

Sant Gadagebaba – इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत.

संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा – प्राचार्य रा.तु. भगत.


श्रीसंत गाडगे महाराज – मधुकर केचे.

श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र – पां.बा. कवडे, पंढरपूर.

संत श्री गाडगे महाराज – डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर.

गाडगे महाराजांच्या गोष्टी – सुबोध मुजुमदार.

समतासूर्य गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत .

स्वच्छतासंत गाडगेबाबा – प्राचार्य रा.तु. भगत.

 

FAQ

sant gadge maharaj belongs to which city?

Ans : Shendgao, Amaravati.

 

sant gadge maharaj belongs to which state?

Ans : Maharashtra.

 

Gadge Baba wife name?

Ans : Sakhubai

 

Sant Gadge Maharaj jayanti?

Ans : 23 February

 

What is the name of Gadge Baba?

Ans : Debuji Zingroji Janorkar

 

Where is Gadge Maharaj Born?

Ans : Shendgaon, Amaravati in Maharashtra State.

 

What did Gadge Maharaj like?

Ans : Cleanliness