नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं marathimulga-com-132834.hostingersite.com या आमच्या मराठी ब्लॉग वरती. मराठी संस्कृती मधील लग्नांमध्ये उखाणा घेणे हे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही देखील लग्नातील मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Marriage ) शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला अगदी नवीन मराठी उखाणे ( New Marathi Ukhane ), मुलींसाठी मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Female ), मुलांसाठी मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Male ), रोमँटिक मराठी उखाणे ( Romantic Marathi Ukhane ) वाचायला मिळतील. तर चला पाहूया लग्नासाठी नवीन मराठी उखाणे ( New Marathi Ukhane for Marriage )…
नवीन मराठी उखाणे | Navin Marathi Ukhane
“हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी,
____ आपण संसाराची सुरवात करूया सर्वांच्या आशीर्वादांनी.”
“कपालांच कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
____ रावांचे नांव घेते, सारे जण बसा.”
“गार गार माठामधले पाणी ताजे ताजे…
____ राव माझ्या मनाचे झाले राजे.”
“वय झाले लभाचे, लागली प्रेमाची चाहूल,
_____ रावांचे जीवनात टाकले मी पाऊल”
“आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून,
_____ रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.”
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट…
_____चे बरोबर बांधली जीवन गाठ.
आजघर मजघर मजघरात होती गादी,
गादीवर होती उशी, उशीवर होती बशी,
___राव बसले मित्रांपाशी, त्यांना हाक मारू कशी.
नागपूरची सूत्री कोकणातले नारळ
____रावांचेनाव घेते साधे आणि सरळ.
गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
_____रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
_____ रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
मुलींसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Female
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, राव हेच माझे अलंकार खरे
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…. रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात, …रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
चंदनाची चोळी अंग अंग जाळी….. रावांचे नाव घेते पूजेच्या वेळी
डबी, डबी में केक, ….राव हे माझे लाखो मे एक.
फुल आहे गंध भाव आहे अंतरी, . सह चालले सातपावलांवरी
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
____ राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती.
माहेरी साठवले, मायेचे मोती… च नाव घेऊन, जोडते नवी नाती
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची _____ च नाव घेते, सून मी _____ ची
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
_____ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा…
_____ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
साताऱ्याचे पेढे, नाशिक चा चिवडा…
____ राव मला, तुम्ही जन्मोजन्मी निवडा
सुखी ठेवतो सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश…
____ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश
नवरदेवासाठी मराठी उखाणे | Navardeva sathi Marathi Ukhane
दवबिंदूंनी चमकतो, रंग…सुखी आहे संसारात,
____ च्या संग
काय जादु केली.. जिंकलं मला एकाक्षणात….
प्रथम दर्शनीच भरली ____ माझ्या मनात.
____ माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल….
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध… शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध
रोमँटिक मराठी उखाणे | Romantic Marathi Ukhane
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस
____ माझे वृंदावन मी त्यांची तुळस #उखाणे
मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
तोंड आठवून च नाव घेते.
_____ चे!
नऊवारी साडी आहे माझ्या महाराष्ट्राचा मान…
____ राव आहेत माझा जीव की प्राण
रातराणीचा सुगंध, त्यात सुटला मंद वारा ….रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा.
हो नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
____ मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
तर मित्रांनो तुम्हाला जर आमचे लग्नातील मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Marriage ) ही पोस्ट आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा. मराठी उखाणे ( Marathi Ukhane ) ही पोस्ट कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा.
- हे देखील वाचा
Marathi Ukhane for Girls.
Useful Marathi ukhane for boys and girls.
Marathi Ukhane for Marriage.
Our Other Sites