Best Marathi Ukhane in 2024 । मराठी उखाणे

मराठी संस्कृती म्हंटल कि लग्नाचं नाव येताच आणखी एक गोष्ट आठवते ते म्हणजे वापरात येणारे उखाणे. आज आपण या पोस्ट मध्ये अशाच काही खास उखाणे जाणून घेणार आहोत जे तुम्ही येणाऱ्या लग्न काळात वापरू शकता किंवा कुणाला पाठवू शकता. इथे तुम्हाला मिळतील नवनवीन मराठी उखाणे तसेच अस्सल मराठी कडक उखाणे.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते बाईको या नात्याने.


गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
___ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.


सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे,
___ रावांना दान दिले, मला जन्माचे.


चांगली पुस्तके आहेत, माणसांचे मित्र,
___रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.


लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
___रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???


आई वडिलांनी केले संस्कार , शिक्षणाने केले सक्षम,
__ सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.


लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर ____ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.


गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र,
___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.


आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस,
__ रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.


ऊन पावसात कष्ट करून, पिकवलं शेतात सोन,
___ राव हेच माझ्या, सौभाग्याच लेणं.


शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर,
___ रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर


दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,
__ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.


श्री गणेश आहे शिव पार्वती चा पुत्र,
___रावांच्या नावाचे घालते मंगळसुत्र.


सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी
नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी
मोठ्यांदा बोलते नका टवकारु कान
___ रावांचे नाव घेते राखून तुमचा मान.


लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती
___पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

Leave a Comment